शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध योजनेचा भुकटी प्रकल्प ठप्प!

By admin | Updated: December 11, 2014 00:48 IST

अतिरिक्त दूध अकोल्याला आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

राजरत्न सिरसाट /अकोलादेशातच नव्हे, तर परदेशात ख्याती मिळवलेला अकोला शासकीय दूध योजेनीतील भुकटी प्रकल्प गत सहा वर्षांपासून ठप्प पडला आहे. दीड लाख लीटर दुधाची भुकटी तयार करणारी येथील यंत्रसामग्री सद्य:स्थितीत गंजण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील अतिरिक्त ठरणारे दूध या भुकटी प्रकल्पाला दिल्यास महाराष्ट्रातील एकमेव या योजनेला पुन्हा गतवैभव होऊ शकते. दीड लाख लीटर दुधावर प्रक्रिया करणार्‍या या शासकीय दूध योजनेत सन १९८८ पासून दूध भुकटी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. अमरावती विभागातून जवळपास ७0 हजार लीटर दुधाचा पुरवठा या योजनेला होत होता. उर्वरित दूध मराठवाड्यातून आणून पूर्ण क्षमतेने या योजनेत भुकटी तयार करण्यात येत होती. येथे निर्मित दज्रेदार दुधाच्या भुकटीला देशातील अनेक प्रांतांमध्ये मागणी तर होतीच, शिवाय परेदशातही या दूध भुकटीची निर्यात करण्यात येत होती; परंतु मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात खासगी दूध डेअरी आणि खासगी भुकटी प्रकल्प सुरू झाल्याने या योजनेला दुधाचा पुरवठा कमी झाला. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेवर होऊन २00८ मध्ये तो बंद पडला. कालांतराने विभागातील दुधाची आवकही कमी झाल्याने कर्मचार्‍यांचेही काम कमी झाले. दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रातील खासगी दूध भुकटी प्रकल्पांना शासनाने प्रतिलीटर दोन रुपये अनुदान दिले. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील या एकमेव दूध भुकटी प्रकल्पाला बसला. हा प्रकल्प बंद पडल्याने लाखो रुपये खचरून उभारण्यात आलेल्या येथील यंत्रांना गंज चढला असून, या योजनेला प्रचंड अवकळा आली आहे. आता याच सर्व खासगी दूध योजना आणि प्रकल्पाकंडे दुधाचा जादा पुरवठा होत आहे. दुधाचे कमिशन वाढवून देण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. हेच अतिरिक्त दूध अकोल्याच्या या दूध भुकटी प्रकल्पाला प्राप्त झाल्यास पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. याकरिता शासनाने या प्रकल्पाची दखल घेण्याची गरज आहे.