शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वस्तु व सेवा कर सर्वांसाठी हिताचा!

By admin | Updated: July 17, 2017 18:53 IST

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय : जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वस्तु व सेवा कर (जीएसटी) हा ग्राहक, व्यापारी आणि देशासाठी हिताचा आहे, हा कायदा व्यवस्थितपणे समजून घ्यावा. कुणीही गोंधळून जाऊ नये. अडचणी असल्यास त्या निश्चितपणे सबंधित विभागाला कळविल्या जातील, असा दिलासा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला.नियोजन सभागृहात आयोजित वस्तु व सेवा कर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी चंद्रपुरचे राज्य कर उपायुक्त सुनील लहाने, अकोल्याचे राज्य कर उपायुक्त सुरेश शेंडगे, आनंद गावंडे, सहायक आयुक्त रमेश दळवी, विदर्भ चेम्बर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पांम्पलिया, सनदी लेखापाल संघाचे अध्यक्ष संजय टेकाळे, कर सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कैलास लोहिया आदींसह मोठया प्रमाणात उद्योजक, व्यापारी नागरिक उपस्थित होते.वस्तु व सेवा कराबाबत विस्तृत माहिती होण्यासाठी तसेच या कराविषयी ग्राहक व व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.जिल्हाधिकारी म्हणाले की, व्यवहारात सुरळीतपणा व पारदर्शीपणा येण्यासाठी वस्तु व सेवा कराची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वांच्या हिताचा विचार करुनच हा कर लागू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहक किंवा व्यापाऱ्यांचे अजिबात नुकसान नाही. या कराची व्याप्ती समजून घेतल्यास बरेच संभ्रम दूर होतील. या कराबाबत इंटरनेटवर सविस्तरपणे माहिती उपलब्ध आहे. यु-टुयूबवर डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी वस्तु व सेवा कर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. तीन भागात असणारे हे मार्गदर्शन पाहिल्यास या कराबाबतच्या शंका निश्चितपणे दूर होतील, असेही यावेळी जिल्हाधिका?्यांनी सांगितले. वस्तु व सेवा करबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजक व व्यापाऱ््यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी शासनाला कळविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या कराबाबतचे संभ्रम दूर करण्यासाठी अकोला जिल्हयाकरीता नियुक्त करण्यात आलेले संबधित विभागाचे अधिकारी यांचा ई-मेल ‘वसुंधरा डॉट सिन्हा अ‍ॅट जीओव्ही डॉट ईन ’या पत्त्यावर मेल करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी व्यापारी, उद्योजकांनी अनेक प्रश्न मांडले, त्यावर जिल्हाधिकारी आणि लहाने यांनी समाधानकारक उत्तरे दिली.