शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर; तीन दिवसाआड पाणीपुरवठा?

By admin | Updated: August 28, 2015 01:13 IST

महापालिकेचा प्रयोग; जलकुंभनिहाय होणार पाणीपुरवठा.

अकोला: जलवाहिन्यांना लागणार्‍या गळत्या आणि त्यामधून धो-धो पाण्याची होणारी नासाडी तसेच जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा न करता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकारामुळे पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. महापालिकेची तांत्रिक बाजू भक्कम नसल्यामुळे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. या सर्व प्रकाराला चाप लावण्यासाठी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता अजय गुजर यांनी प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय संबंधित भागाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात शुक्रवारी केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. आजरोजी महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात २८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अर्थातच, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मोठी जबाबदारी मनपाच्या जलप्रदाय विभागावर येऊन ठेपली आहे. मनपाद्वारे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून, तांत्रिक बाजू भक्कम केल्यास भविष्यात किमान चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. आजपर्यंत जलप्रदाय विभागातील कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. सक्षम अधिकारी नसल्याने मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांनी पाणीपुरवठय़ाचे कामकाज चालवले. यादरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांची मनपाच्या जलप्रदाय विभागात बदली झाली. पाणीपुरवठय़ाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता हुंगे आणि शहर अभियंता गुजर यांनी पाणीपुरवठय़ाचा आराखडा तयार केला. यापूर्वी महान येथून पाण्याचा उपसा केल्यानंतर तो जलकुंभापर्यंत न पोहचविता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात होता. यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होण्यासोबतच शेवटच्या वस्त्यांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती होती. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत नेमके किती लीटर पाणी नागरिकांना दिल्या जात आहे, याचा हिशेबही जुळत नव्हता. याअनुषंगाने प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. एका जलकुंभावरून सकाळी तसेच सायंकाळी संबंधित भागाला टप्प्याटप्प्याने पाणीपुवठा केला जाईल. जलकुंभाद्वारे होणार्‍या पाणीपुरवठय़ाला दाब राहणार असल्याने शेवटच्या घटकापर्यंंत पाणी पोहोचण्यास मदत होण्याचा मनपाला विश्‍वास आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अकोलेकरांना चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.