गायगाव (जि. अकोला), दि. २४- येथील एका ३0 वर्षीय इसमाला मुक्ताईनगरजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबरच्या रात्री घडली.येथील गुणवंत रामदास खेतकर (३0) हे कामानिमित्त मुक्ताईनगरला मोटारसायकलने गेले होते. तेथून ते गायगाव येथील शंकर खोपे (२0) यांच्यासोबत मोटारसायकलने शुक्रवारी रात्री ११ वाजता गायगावकडे येत असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक देऊन उडविले. या अपघातात गुणवंत खेतकर यांचा जागीच मृत्यू झाला. गुणवंत खेतकर यांचे मोबाइल शॉपी व डेली नीड्स सेंटरचे दुकान असून, त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच स्थानिक बसस्थानकावरील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. मृतक गुणवंत खेतकर यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
गायगावच्या व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू
By admin | Updated: December 25, 2016 02:41 IST
३0 वर्षीय इसमाला मुक्ताईनगरजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबरच्या रात्री घडली.
गायगावच्या व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}