वाडेगावातील जुगारावर छापा, १० अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST2021-01-25T04:18:56+5:302021-01-25T04:18:56+5:30

अकाेला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे माेठ्या प्रमाणात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाने शनिवारी छापा ...

Gambling raid in Wadegaon, 10 arrested | वाडेगावातील जुगारावर छापा, १० अटकेत

वाडेगावातील जुगारावर छापा, १० अटकेत

अकाेला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे माेठ्या प्रमाणात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाने शनिवारी छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून १० जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाडेगाव येथे खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविराेधी पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने वाडेगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून किशोर रामराव तेलगाेटे, रामदास रामचंद्र धर्मकर, डिगाबार किसन कोल्हे, राजेंद्र मालोजी तायडे, सतीश गुलाबराव वाघ, रमेश महादेवराव खरडे, रामदास दशरथ मेसरे, मनोहर नत्थुजी डोंगरे, संतोष अंबादास माहाेरे व दिनेश ओंकार मानकर (सर्व रा. वाडेगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम साहित्य असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या जुगारींविरुद्ध बाळापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Gambling raid in Wadegaon, 10 arrested