शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

अवैध धंदेवाल्यांची पोलिसांवरच नजर; जुगार अड्डे व क्लब चालविणाऱ्यांनी लावले सीसी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:55 PM

अकोला: जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, या जुगार अड्डे आणि क्लबवर पोलिसांच्या वाढत्या फेºयांवर अंकुश लावण्यासाठी अवैध धंदेवाल्यानी पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅ मेरे लावल्याची खात्रीलायक माहिती आहे.

- सचिन राऊत

अकोला: जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, या जुगार अड्डे आणि क्लबवर पोलिसांच्या वाढत्या फेºयांवर अंकुश लावण्यासाठी अवैध धंदेवाल्यानी पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅ मेरे लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. या सीसी कॅमेºयांमुळे पोलिसांचे आपसातच वाद वाढले असून, धंद्यांवर ये-जा करणारे आणि ठाणेदारांना अंधारात ठेवत हप्तेखोरी करणाºयांचे चांगलेच वांधे झाले आहेत; मात्र यामुळे जुगार अड्डे अन् क्लब चालविणाºयांचे मनोबल पोलिसांपेक्षाही वाढल्याचे या प्रकारामुळे समोर येत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे प्रचंड फोफावले असून, याकडे पोलिसांकडून कानाडोळा केल्या जात आहे. गत काही महिन्यांपासून हे अवैध धंदे जोरात सुरू असून, शहरासह जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ सुरू आहे. जुगार अड्ड्यावर छापेमारी केल्यानंतर तीन ते चार ठिकाणावर पोलिसांनाच ताब्यात घेण्यात आले होते; मात्र खात्याची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून त्यांना सोडण्यात आल्याची चर्चाही जोरात आहे. पोलीस अधीक्षकांनी दिले होते निर्देशडाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांचे मोठे जुगार अड्डे अन् क्लब सुरू आहेत. प्रचंड तक्रारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाणे गाठून सदरचे धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्यानंतरही सदरचे अवैध धंदे जोरात सुरू असून, पोलिसांच्या हप्तेखोरीमुळेच अवैध धंदे व क्लब चालविणाºयांनी सीसी कॅमेरे लावून त्यांच्यावरच नजर ठेवण्यासाठी धाडस केल्याचे बोलल्या जात आहे. अधिकाºयांचाही वसुलीदारप्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ वसुलीचे कामकाज करण्यासाठी पोलीस कर्मचाºयाची अघोषित नियुक्ती केली आहे. ठाणेदारांच्या वरिष्ठ अधिकाºयांचेही जिल्ह्यात वसुलीदार असल्याची चर्चा खात्यात जोरात आहे. एका अधिकाºयाचा तर एक वकीलच वसुलीदार असून, दोघेही मॉर्निंग वॉकच्यावेळी वसुली करीत असल्याची माहिती आहे. माफियांच्या थेट ठाण्यात वावरजुगार अड्डे, क्लब आणि वरली अड्डे चालविणाºयांचे धाडस प्रचंड वाढले असून, त्यांच्या दिवसाआड पोलीस ठाण्याच्या आतमध्ये वावर असल्याचे दिसून येते. पोलिसांकडून ज्यांच्यावर कारवाई केल्या जाते ते माफिया दोन तीन दिवसानंतर पुन्हा ठाण्यात येऊन बसतात, यावरून पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. अकोट फैल, डाबकी रोड, एमआयडीसी, मूर्तिजापूर, पिंजर, हिवरखेड, बोरगाव मंजू, पातूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जोरात हे धंदे सुरू आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही