छत्रपती शाहु महाराज स्मारकासाठी निधी मंजुर

By Admin | Updated: May 7, 2014 23:09 IST2014-05-07T22:29:18+5:302014-05-07T23:09:19+5:30

शाहु महाराजांच्या ग्रंथालयासह स्मारकासाठी निधीला मंजुरी

Fund sanction for Chhatrapati Shahu Maharaj Memorial | छत्रपती शाहु महाराज स्मारकासाठी निधी मंजुर

छत्रपती शाहु महाराज स्मारकासाठी निधी मंजुर

खामगाव : येथे शाहू महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात यावे, अशी मागणी खाामगावकरांनी राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषदेत केली होती. त्यानुसार शाहु महाराजांच्या ग्रंथालयासह स्मारकासाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. काही महिन्यापुर्वी शिवशाही रथयात्रा खामगावात आली असता युवराज संभाजी राजे भोसले यांनी शाहु महाराजांच्या स्मारकाची मागणी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्याकडे केली होती. तेव्हा आ.दिलीपकुमार सानंदा यांनी शाहु महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आदरांजलीच्या कार्यक्रमाप्रसंगी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी छत्रपती शाहू महाराजांचे ग्रंथालयासह भव्य स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात ७५ लक्ष रुपयांच्या निधीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली असल्याचे सांगितले. दीड कोटी रुपये खर्च करुन हे भव्य दिव्य स्मारक खामगावात जून महिन्यामध्ये निविदा काढण्यात येणार असल्याची माहितीही आ. दिलीपकुमार सानंदा यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.  

Web Title: Fund sanction for Chhatrapati Shahu Maharaj Memorial