चौघांनी युवकाला लुटले, दोघे गजाआड

By Admin | Updated: September 6, 2014 02:18 IST2014-09-06T02:18:00+5:302014-09-06T02:18:00+5:30

अकोला येथे घरी जाणार्‍या युवकाला चौघांनी मारहाण करून लुटल्याची घटना.

Four of them robbed the youth, both of them were abducted | चौघांनी युवकाला लुटले, दोघे गजाआड

चौघांनी युवकाला लुटले, दोघे गजाआड

अकोला : घरी जाणार्‍या युवकाला चौघांनी मारहाण करून लुटल्याची घटना गुरुवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास टिळक रोडवर घडली. मानेक टॉकीजजवळ राहणारा विशाल गिरीष निर्मल (२९) याच्या तक्रारीनुसार, गणपती पाहून घरी परतत असताना, एमएच ३0 पी ८६३३ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातील चालकाने त्याला कुठे जायचे आहे. असे विचारले. त्यानंतर ऑटोरिक्षामध्ये बसलेले तिघे जण बाहेर आले त्यांनी थापडा, बुक्यांनी मारहाण केली आणि त्याच्याजवळील रोख १७ रुपये काढून घेतले आणि पळ काढला. पळून जाणार्‍या सैय्यद अख्तर सैय्यद जाफर (३२ रा. गुलजार पुरा) आणि वसीम खान मसुद खान (३६ रा. सज्जनपुरा खामगाव) या दोघांना नागरिकांनी पकडले आणि रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Four of them robbed the youth, both of them were abducted