Foreign-made pistol seized from youth | युवकाकडून विदेशी बनावटीची पिस्तुल जप्त
युवकाकडून विदेशी बनावटीची पिस्तुल जप्त

अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका युवकाकडे विदेशी बनावटीची पिस्तूल असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळताच स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी या युवकावर पाळत ठेउन त्याच्याकडून ही विदेशी बनावटीची पिस्तूल जप्त केली.
वाशिम बायपास परिसरात उमेर हुसैन साबिर हुसैन हा युवक विदेशी बनावटीची पिस्तूल घेउन फीरत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून या युवकाचा शोध घेतला. त्यानंतर युवकाच्या हालचाली संशयास्पदरीत्या दिसल्याने पथकाने उमेर हुसैन साबिर हुसैन याला ताब्यात घेउन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विदेशी बनावटीची पिस्तूल आढळली. सदर पिस्तूल जप्त करण्यात आली असून या युवकाविरुध्द जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, पीएसआय तुषार नेवारे, अशोक चाटी, रवि इरचे, शेख रफीक, एजाज अहमद,अब्दुल माजिद यांनी केली.


Web Title:  Foreign-made pistol seized from youth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.