शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आंतरराष्ट्रीय शाळेच्या निवडीसाठी जिल्ह्यातील पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 1:08 PM

अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.

अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १७ शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळावी. यासाठी अर्ज केले. मंडळाने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळा निश्चित केल्या आहेत. सध्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यांकडून या शाळांचे बाह्यमूल्यांकन करण्यात येत आहे.डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यंदा जिल्ह्यातील दर्जेदार १७ जि.प. व मनपा शाळांनी आॅनलाइन अर्ज केले. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. गतवर्षीसुद्धा जिल्ह्यातील शाळांनी अर्ज केले होते; परंतु एकाही शाळेची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड होऊ शकली नाही. यंदा पाच शाळांची निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील एक किंवा दोन शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पाच शाळांच्या बाह्यमूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यांची चमू अकोल्यात आली आहे. ही चमू ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान दररोज एका शाळेची तपासणी करीत आहे. या चमूने तपासणी केल्यानंतर शाळांना गुण देण्यात येणार आहेत. सर्वाधिक गुण मिळविणाºया आणि निकष पूर्ण करणाºया शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची दुसºया टप्प्यात मुलाखत होईल. (प्रतिनिधी)काय आहे आंतरराष्ट्रीय शाळा?राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध करून, भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध करून विद्यार्थ्यांसोबतच पालकांना या शाळांमधील शिक्षणासाठी परावृत्त करावे आणि खासगी व इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांच्या तुलनेत दर्जेदार शिक्षण द्यावे, यासाठी शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले. या मंडळाची संलग्नता प्राप्त करणारी शाळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाईल. या शाळेला शासनाकडून विशेष १0 कोटी रुपये अनुदान देण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने जिल्ह्यातील १७ पैकी ५ शाळा निश्चित केल्या. ही भूषणावह बाब आहे. दोन दिवसांपासून राज्यस्तरीय मूल्यांकन समितीचे सदस्य शाळांचे बाह्यमूल्यांकन करीत आहेत. आता बाह्यमूल्यांकनात कोणत्या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळते, हे महत्त्वाचे राहील. जिल्ह्यातील एक किंवा दोन शाळांना हा बहुमान मिळाला तर जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी राहील.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्यजिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र