शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

५ डिसेंबरपासून वेगळय़ा विदर्भासाठी अंतिम लढाई- चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 01:52 IST

वेगळ्या विदर्भासाठी नागपूर येथे आयोजित अधिवेशनात शक्तिप्रदर्शन करण्याचा इशारा चटप यांनी पत्रपरिषदेत दिला.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ डिसेंबरपासून वेगळ्या विदर्भासाठी अंतिम टप्प्याची लढाई सुरू होणार आहे. हे महाराष्ट्र विधानसभेचे राज्यातील अंतिम हिवाळी अधिवेशन असेल, यानंतर वेगळ्या विदर्भाचेच अधिवेशन नागपुरात होईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, की अनुशेष, कुपोषण, नक्षलवाद याचे एकच उत्तर वेगळा विदर्भ हे आहे. विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानाही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विदर्भ विकासाचे आश्‍वासन देणार्‍यांच्या राजवटीतच विदर्भाचा अनुशेष कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे दिसत आहे. यासाठी आता आर-पारची लढाई करावी लागणार आहे. विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मेळघाटातील कुपोषण आणि नक्षलवाद या तीन प्रमुख समस्या आहेत, विदर्भाचे वेगळे राज्य झाल्याशिवाय या समस्या सुटू शकणार नाहीत, छोट्या राज्यांमुळे देशाचे नुकसान नाही, तर फायदाच होतो. छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या सोयीची असतात. यासाठी विदर्भ राज्याच्या दुसर्‍या विधानसभेचे प्रतिअधिवेशन डिसेंबरमध्ये नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. याप्रसंगी डॉ. श्रीनिवास खांदेवाले वेगळ्या विदर्भाच्या विकासाचे प्रारुप मांडणार असल्याची माहिती अँड. वामनराव चटप यांनी दिली. अकराही जिल्ह्यातील ८५ तालुक्यांमधून वेगळ्या विदर्भाचा जागर करणार आहेत. यात एकूण २५ हजार लोक सहभागी होणार आहेत. या पाचही ठिकाणावरून निघणार्‍या दिंड्या नागपुरात होणार्‍या हिवाळी अधिवेशनात धडकणार असल्याचे यांनी सांगितले. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांकडून आम्हाला अपेक्षा होत्या. पण, भाजपाने आमच्या अपेक्षांची पूर्तता केलेली नाही. तसेच त्याची किंमत भाजपाला पुढल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल. ३१ डिसेंबरपर्यंंत वेगळा विदर्भ झाला नाही, तर १ जानेवारीपासून हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याची माहितीही दिली.