सायखेड (जि. अकोला): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना बाश्रीटाकळी तालुक्यातील जांभरूण येथे सोमवारी घडली. महादेव परसराम नांदे (३२) हे जीवन संपविलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. त्यांचे वडील परसराम नांदे यांच्याकडे सामायिक शेती आहे. गतवर्षी त्यांनी विहीर खोदण्यासाठी कर्ज काढले होते; मात्र नापिकीमुळे हे कर्ज फेडू शकले नाही. वडिलांवर कर्जाचा डोंगर वाढतच होता. अखेर महादेव नांदे यांनी विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}