शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

By admin | Updated: November 29, 2014 22:05 IST

नापिकीमुळे आर्थिक संकट: वाट कशी काढणार?

संतोष येलकर/अकोलापावसाचे उशिरा झालेले आगमन, त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, गरज असताना पावसाने मारलेली दडी अन् गरज नसताना काही भागांमध्ये झालेली अतवृष्टी, या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाची प्रचिती देत, निसर्गाने यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीची पिकांनाही जबर तडाखा दिल्याने, राज्यातील शेतकरी पुरता कोलमडला असून, त्याला मुलामुलींचे शिक्षण, विवाहादी खर्चाची चिंता भेडसावू लागली आहे. राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या सहा महसूली विभागांतर्गत जिल्ह्यांमधील एकूण ३९,४३४ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १९,0५९ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातल्या सर्वच म्हणजेच ७, २४१ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील २,0२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण १९,0५९ गावांमध्ये पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत संसाराचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक संकटातून वाट कशी काढावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९,0५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली असून, त्या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती लागू करण्यासही मंजूरी दिली आहे. त्यानुसार शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असले तरी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी येणारा खर्च, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च, तसेच मुला-मुलींचे विवाह यासाठी येणारा खर्च कसा भागविणार, ही चिंता दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांना सतावत आहे.अमरावती विभागातील जिल्हानिहाय टंचाईसदृश गावे!जिल्हा गावेअमरावती            १९८१अकोला                  ९९७यवतमाळ             २0५0बुलडाणा               १४२0वाशिम                   ७९३............................एकूण                    ७२४१