हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: June 12, 2015 17:42 IST2015-06-12T17:42:08+5:302015-06-12T17:42:08+5:30

अकोल्यातील मिश्रा हत्या प्रकरण.

Extortion in the police custody of the accused | हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

अकोला : दुर्गा चौकातील भागवत प्लॉटमध्ये राहणारे जयंतीलाल ऊर्फ जगदंबाप्रसाद मिश्रा यांची हत्या करणारा आरोपी रविशंकर चौबे याची गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा १४ जूनपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भागवत प्लॉटमधील जयंतीलाल मिश्रा यांची ६ जून रोजी निर्घृण हत्या झाली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांना शिवसेना वसाहतीमध्ये राहणारा आरोपी रविशंकर चौबे हा शरण आला होता. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, गुरुवारी त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
हत्याकांडामध्ये आणखी काही आरोपी गुंतले असण्याची शक्यता असल्याने, त्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपी पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने पुन्हा त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

Web Title: Extortion in the police custody of the accused