शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांचा अभ्यास करणा-या समितीस मुदतवाढ

By admin | Updated: August 25, 2015 01:52 IST

समिती आता तिचा अहवाल ३१ ऑगस्टपूर्वी शासनाला सादर करणार.

बुलडाणा : राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणार्‍या अडत, तोलाई आदी मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या समितीस शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ही समिती आता तिचा अहवाल ३१ ऑगस्टपूर्वी शासनाला सादर करणार आहे. ३0 मार्च २0१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील बाजार समित्यांमध्ये आकारल्या जात असलेल्या अडत व तोलाईच्या दरासंदर्भात, तसेच अडत व तोलाई कुणाकडून वसूल करावी याबाबत शासनास अभ्यास करुन मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समिती गठीत करण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल ३१ मे २0१५ पूर्वी शासनास सादर करणार होती; मात्र समितीस विहीत कालावधीत आपला अहवाल सादर करणे शक्य झाले नसल्यामुळे समितीच्या विनंतीनुसार ३१ जुलै २0१५ पर्यंंंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. समितीमध्ये समाविष्ट विधानसभा सदस्य विधीमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याने समितीची सभा घेता आली नाही. त्यामुळे समिती अध्यक्षांनी समितीस आणखी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती केली होती. त्यानुषंगाने सदर समितीस ३१ ऑगस्ट २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने २४ ऑगस्ट रोजीच्या निर्णयान्वये दिला आहे.