रसिकाश्रयचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

By Admin | Updated: June 15, 2015 01:49 IST2015-06-15T01:49:44+5:302015-06-15T01:49:44+5:30

सांस्कृतिक मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध.

Excitement cultural program | रसिकाश्रयचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

रसिकाश्रयचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

अकोला : स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह येथे रसिकाश्रय संस्थेचा ५४ वा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलावंतांनी सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक मेजवानीमुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधाकरराव गणगणे होते, तर खासदार संजय धोत्रे, उद्योजक रमाकांत खेतान, अभिजित परांजपे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्यरसिकाश्रयह्ण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर काही कलावंतांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना वर्षा बाकरे पाटील यांनी सुरुवातीला शिवस्तुती आणि तराणा सादर केला. त्यानंतर गायक अनिरुद्ध खरे यांनी कबिराचे अभंग प्रस्तुत केले, तर त्यांची मुलगी शांभवी खरेने नाट्यगीत गायन सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तबल्यावर विवेक देशपांडे, तर संवादिनीवर उमेश चापके यांनी संगत केली. त्यानंतर रुपाली पाढणे यांच्या ह्यमी सातार्‍याची गुलछडीह्ण या लावणी नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दिलीप देशपांडे यांच्या आचार्य अत्रेंच्या भाषणांवर आधारित अष्टपैलू अत्रे या एकपात्री प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. शाहीर वसंत मानवटकर व रंगकर्मी रमेश थोरात यांच्या तुंबडी गायनाने रसिक तृप्त झाले. जाधव यांनी ह्यसंक्षिप्त मी नटसम्राटह्ण या दीर्घांकाचे सादरीकरण केले. त्यात सीमा तर्‍हाळकर यांनीही भूमिका साकारली. आयोजित कार्यक्रमाचे रंगमंच व्यवस्थापन उदय दाभाडे, अनिल कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत जामदार यांनी तर आभार अभिजित परांजपे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकांत गावंडे, सागर देशमुख, गोविंद उमाळे, महेश इंगळे, विशाल कांबळे यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Excitement cultural program