शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा सफाया

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला.

अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील अतिक्रमित भाजी विक्रेत्यांसह परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. कारवाईला अडथळा आणण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुरुवारी स्वत: आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना रस्त्यावर उतरावे लागले. रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण थाटल्यास फौजदारीचा इशारा आयुक्तांनी दिला. अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या जठारपेठ चौकात भाजी विक्रेत्यांनी चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ.प्रमिलाताई टोपले यांच्या खासगी हॉस्पिटलसह छत्रपती शिवाजी माध्यमिक शाळा व रहिवासी इमारतींना अक्षरश: भाजी विक्रेता, फळ विक्रेत्यांनी विळखा घातल्याचे चित्र आहे. परिणामी या मार्गावरून पायी चालणेदेखील अवघड झाले. परिसरात खासगी शाळा, मनपा शाळांसह मंगल कार्यालये असून, या मार्गावरूनच एसटी बसेसचीसुद्धा वर्दळ असते. अतिक्रमकांनी नागरिकांच्या घरालाच विळखा घातल्याने वादावादाचे प्रसंग उद्भवतात. या परिसरातील अतिक्रमण हटविण्या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला निर्देश दिले होते; परंतु मनपातील काही खादाड प्रवृत्तीच्या अधिकार्‍यांमुळे एकही भाजी विक्रेता जागेवरून उठला नाही, हे उल्लेखनीय. अखेर नागरिकांच्या समस्येची दखल घेत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जठारपेठ चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावरील संपूर्ण अतिक्रमणाचा फडशा पाडला. यावेळी आयुक्तांसह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांसह कर्मचारी उपस्थित होते.