शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपण्याच्या मार्गावर; नाफेडचे खरेदी केंद्र उघडले नाहीत

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची व्यापा-यांकडे धाव.

विवेक चांदूरकर/अकोला

       मूग, उडीद व सोयाबीन विक्रीचा हंगाम संपत आला असला तरी अद्याप शासनाच्यावतीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. आधीच अल्प हमीभाव जाहीर करून दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांची खिल्ली उडविण्यात आली असून, खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे. यावर्षी निसर्गाने शेतकर्‍यांना दगा दिला. अनियमित व अल्प पाऊस झाल्यामुळे पिकांची प्रचंड हानी झाली. उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही घट आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनाने यावर्षी अल्प हमीभाव जाहीर केले. त्यामुळे बाजारपेठेतही पिकांना कमी भाव मिळत आहेत. अनेकदा हमीभावावर बाजारपेठेतील भाव अवलंबून राहतात. यावर्षी कापसाला २७५0 रुपये हमीभाव देण्यात आला आहे तर सोयाबीन २५६0 रुपये, सूर्यफूल ३७५0, ज्वारी १५३0, मका १३१0, मूग ४६00, उडीद ४३५0, तूर ४३५0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. नाफेडच्यावतीने खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी व्यापार्‍यांकडे जात आहेत. सोयाबीनची विक्री ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येते. सध्या नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला २७00 ते ३२00 रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे खरेदी केंद्र सुरू न करण्याचा नाफेडचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.