अनधिकृत चौपाटीवरील दुकानांचा सफाया

By Admin | Updated: June 12, 2015 17:43 IST2015-06-12T17:43:26+5:302015-06-12T17:43:26+5:30

गांधी चौकात मनपाची कारवाई.

The elimination of unauthorized four-wheeler shops | अनधिकृत चौपाटीवरील दुकानांचा सफाया

अनधिकृत चौपाटीवरील दुकानांचा सफाया

अकोला : गांधी चौक स्थित दुर्गादेवी मंदिरालगतच्या अनधिकृत चौपाटीवरील अतिक्रमित दुकानांचा सफाया करण्यात आला. गुरुवारी प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील खासगी रुग्णालयांनी मोकळा श्‍वास घेतला. गांधी रोडवरील दुर्गादेवी मंदिराचा परिसर पार्किंंगसाठी घोषित आहे. या ठिकाणी मनपा उर्दू मुलांची व मुलींची शाळा असून, खासगी रुग्णालयांची मोठी संख्या आहे. मागील काही वर्षांंपासून चक्क मुख्य रस्त्यावरच खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी व्यवसाय उभारला. आजरोजी या भागात रस्ताच अस्तित्वात नसल्याची वस्तुस्थिती आहे. याशिवाय खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रचंड प्रमाणात घाण निर्माण होत असल्याने या ठिकाणी अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली. अतिक्रमकांच्या मुजोरीला कंटाळून अनेक दुकानदारांनी त्यांची दुकाने भाडेतत्त्वावर दिली आहेत. या बाबीची उशिरा का होईना, मनपा प्रशासनाने दखल घेतली आणि १0 जून रोजी सायंकाळी या भागातील अतिक्रमकांना हुसकावून लावल्यानंतर ११ जून रोजी पुन्हा कारवाईचा बडगा उगारत थेट पक्क्या अतिक्रमित दुकानांचा सफाया केला. यामध्ये पूनम आईस्क्रीम, दीपिका कोल्ड्रिंक्स, शीतल कोल्ड्रिंक्स, नॉव्हेल्टी ज्यूस सेंटरसह इतर अतिक्रमकांच्या दुकानांचा समावेश होता.

Web Title: The elimination of unauthorized four-wheeler shops