शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी स्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया

By admin | Updated: January 9, 2015 01:26 IST

अकोला येथील अतिक्रमण निमुर्लन मोहिम;अनधिकृत फलक व झेंडही काढले.

अकोला : शहरातील अनधिकृत फलक, चौकातील नामफलक, झेंडे काढण्यासोबतच पोलीस पथक व महापालिकेने शहरातील अतिक्रमणावरदेखील लक्ष केंद्रित केले. गुरुवारी दुपारी पोलीस पथकाने महा पालिकेच्या मदतीने लक्झरी बसस्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया केला. लक्झरी बसस्टँड व पोलीस मुख्यालयासमोर अनेकांनी टीनपत्र्यांची खोके थाटून अतिक्रमण केले. या अतिक्रमणाचा त्रास पोलीस मुख्यालयातील कर्मचार्‍यांनाही होत असल्याने साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पोलीस पथकाला लक्झरी बसस्टँडवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. पोलीस पथक व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृत फलक, होर्डिंंग्ज, झेंडे, दुकानांवरील बोर्ड, चौकांमध्ये विनापरवानगी लावण्यात आलेले लोखंडी फलक हटविण्याची विशेष मोहीम ६ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. गुरुवारी पोलीस पथक गोरक्षण रोड व शिवणी परिसरामध्ये कारवाईची मोहीम राबविणार होते; परंतू अचानकपणे पोलीस व महापालिकेचे पथक पोलीस मुख्यालयासमोरील लक्झरी बसस्टँड परिसरात पोहोचले आणि परिसरातील ट्रॅव्हल्स एजन्सींवर लावलेल्या फलकांसह परिसतील लोखंडी नामफलकही हटविले. त्यानंतर पथकाने गजराजाच्या मदतीने परिसरातील अतिक्रमित टीनपत्र्यांची खोके, पानठेले, हॉटेल हटविले. त्यामुळे येथील व्यावसायिक व ट्रॅव्हल्स एजन्सी चालकांची एकच धावपळ उडाली. काहींनी तर स्वत:हून अतिक्रमण हटविले.