शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अनाथालय मुक्त भारत बनविण्यासाठी प्रयत्न! - श्रेया भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:03 IST

अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशामध्ये दोन कोटी अनाथ मुले आहेत. ही मुले अनाथ म्हणून नव्हेतर स्वनाथ म्हणून जगावी. त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावेत. त्यांना कुटूंब मिळावेत. सध्या देशात ४१00 मुलांना दत्तक विधान करून कुटूंब मिळाले आहे. अनाथमुक्त, अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी शनिवारी सांगितले. अनाथ मुलांच्या पुर्नवसनासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

 स्वनाथ फाऊंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश काय? - स्वनाथ फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून, तिची स्थापन जून २0१९ मध्ये झाली. अनाथ मुलांना स्वनाथ बनवून त्यांना हक्काची कुटूंब मिळवून देणे, त्यांचे अधिकार, त्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी स्वनाथने कार्य हाती घेतले आहे. समाजाचे पाठबळ मिळाले तर अनाथ स्वनाथ बनतील.  

अनाथ मुलांचे पुर्नवसन कसे करणार?  - देशात, राज्यात अनेक मुले अनाथ आहेत. अशा प्रत्येक अनाथ मुला-मुलींना कुटूंब मिळवून द्यावे. त्यांना कुटूंब मिळाले तर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक विकास होईल. अनाथ हे अनाथ न राहता, स्वनाथ बनावे. स्वनाथ म्हणजे, मी माझाच नाथ ही आमची संकल्पना आहे. 

अनाथ मुलांना कुटूंब मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत.? - गणेशोत्सवामध्ये गणपतीला घरी आणतो. दहा दिवस मनोभावे पुजतो. त्याऐवजी अनाथ मुलाला घरी आणले, त्याला न्हाऊमाखू घातले तर गणेशाच्या पूजनाचे पुण्य लाभेल. अशा पद्धतीने आम्ही येत्या गणेशोत्सवामध्ये १00 अनाथ मुलांना काही कुटूंबांच्या घरी पाठविणार आहोत. त्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे. यातूनच कुटूंबांची इच्छा मुलांना दत्तक घेण्याची झाल्यास, त्यांना प्रवृत्त करणे, अकोल्यात गायत्री शिशूगृह, उत्कृर्ष अनाथालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

 - अनाथालये असताना, कुटूंब पालकत्व कसे स्विकारणार ? सध्या सामाजिक संस्थांचे बाजारीकरण झाले आहे. अनाथालय हे अनाथ मुलांसाठी तात्पुरती व्यवस्था आहेत. यातून त्यांचा शारिरीक, भावनिक विकास होत नाही. अनेकदा येथील मुले वाममार्गाला लागली आहेत. त्यांना अत्याचाराला बळी पडली आहेत. अनाथमुक्त आणि अनाथालयमुक्त भारतासाठी कुटूंब व्यवस्थेत अनाथ मुले गेली पाहिजे. त्यांचे पालकत्व स्विकारण्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे.  यासाठी स्वनाथ फाऊंडेशन काम करीत आहेत. त्याला समाजाचे पाठबळ सुद्धा मिळत आहे. अनाथ मुले ही स्वनाथ बनावी. हेच आमचे ध्येय आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत