शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:06 IST

मनोविकृती विभागात ईईजी मशीन असूनही तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने ईईजी सेवा बंद पडली आहे.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ईईजी मशीन असूनही तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने ईईजी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे मनोविकृती विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतात. कधी औषध नसते, तर कधी मनुष्यबळाचा अभाव, यामुळे नेहमीच सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा प्रभावित होते. अशातच मनोरुग्ण विभागातही मनुष्यबळाअभावी रुग्णसेवा प्रभावित होत आहे. मनोरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी येथे २००७ पूर्वीच नवीन ईईजी मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु या मशीनचा नियमित वापर न झाल्याने ती धूळ खात पडून होती. त्यामुळे मानसिक आजार, रुग्णांची चिडचीड, डोक्याला मार लागणे, बेशुद्ध असणे अशा परिस्थितीतील रुग्णांची तपासणी प्रभावित झाली आहे. शासन रुग्णांसाठी कोट्यवधीचा खर्च करूनही रुग्णांना सुविधांचा लाभ मिळत नाही; मात्र डॉक्टरांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नाही. ईईजी सेवा बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. ही सेवा त्वरित सुरू करण्यात यावी, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराअध्यक्ष आशीष सावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु रुग्णालय प्रशासनाकडे तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही सेवा ठप्प पडल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.मनोविकृती विभागातील ईईजी मशीन बंद आहे. विभागात मनुष्यबळच कमी असल्याने मशीन दुरुस्त केली, तरी कशी वापरावी हा प्रश्न आहे. मशीन हाताळण्यासाठी न्यूरॉलॉजिस्टची गरज आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय