शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: January 7, 2015 01:28 IST

एटीएमही पडले बंद, संप मागे घेतल्याने खातेधारकांना दिलासा.

अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे लीजलाइनवर इंटरनेटद्वारे कनेक्ट राहणार्‍या जिल्हय़ातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार मंगळवारी दिवसभर ठप्प पडले. सोमवार, ५ जानेवारीपासून उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका राष्ट्रीयीकृत बँकांसह डाक खात्यालादेखील बसल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडले. एटीएमसुद्धा बंद पडल्याने खातेधारकांची चांगलीच अडचण झाली. शनिवारी ह्यहाफ डेह्ण, रविवारी साप्ताहिक सुटी, तर सोमवार-मंगळवारी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीनंतर बुधवारी नियोजित संपाचे सावट बँकांच्या व्यवहारावर होते; मात्र नियोजित संप मागे घेण्यात आल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. बीएसएनएलच्या लीजलाइनवर मिळणार्‍या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार चालतात. नागपूर येथील बीएसएनलच्या कोर-रूटरच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीयीकृत बँक इंटरनेटच्या लीजलाइन देण्यात आल्या आहेत. बँकांमार्फत कोअर-रूटरचा वापर अधिक होत असल्याने सोमवारी दुपारी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मंगळवारीदेखील हा बिघाड कायम असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प होते.