शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पुढा-यांच्या निष्क्रियतेमुळे शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड

By admin | Updated: May 13, 2017 05:04 IST

विधी प्रवेश परीक्षेसाठी अकोल्यातील विद्यार्थी जिल्ह्याबाहेरविधी प्रवेश परीक्षेसाठी अकोल्यातील विद्यार्थी जिल्ह्याबाहेर

अकोला : राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीच्या नियमावलीनुसार, आगामी २० आणि २१ मे रोजी होणाऱ्या (एलएलबी) विधी प्रवेश परीक्षेचे केंद्र अकोल्यात दिले नसल्याने जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी २० आणि २१ मे रोजी अमरावतीला जावे लागणार आहे. अकोल्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.एकीकडे वाशिम, बुलडाणासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे परीक्षा केंद्र दिले गेले असून, अकोल्यास प्रवेश परीक्षा केंद्र देण्यात आले नाही. मागील वर्षापासून ह्यएलएलबी-लॉह्णचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्यसीईटीह्ण म्हणजे एन्ट्रन्स परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले. बारावीनंतर पाच वर्षे आणि पदवीनंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मागील वर्षी या नियमावलीमुळे अनेक विद्यार्थांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. शेवटी ज्या विद्यार्थ्यांनी केवळ एन्ट्रन्स अर्ज अपलोड केला, परीक्षेत अपात्र ठरलेत, अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला गेला; मात्र ज्यांनी सीईटीसाठी अर्ज दिला नाही, अशांना मात्र ह्यलॉह्णला अ‍ॅडमिशन नाकारले गेले. यंदादेखील ती वेळ येऊ नये म्हणून लॉ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला आहे. मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिलेले नाही. या तुलनेत वाशिम आणि बुलडाणा येथे केंद्र दिले आहेत. बुलडाणा आणि वाशिमच्या तुलनेत अकोल्यात लॉ कॉलेज जास्त असताना केंद्र का नाकारले गेले, हे अद्याप समजलेले नाही. विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. एवढे सारे असताना अकोल्यावर अन्याय का, असा प्रश्न शेकडो विद्यार्थ्यांकडून केला जातो आहे. पाच वर्षांचा लॉ कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची २० मे रोजी आणि तीन वर्षांचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची २१ मे रोजी परीक्षा घेतली जात आहे. या दोन्ही परीक्षा देण्यासाठी अकोल्यातून शेकडो विद्यार्थ्यांना अमरावतीत जावे लागणार आहे. एका विद्यार्थ्यास किमान चारशे रुपये खर्च अपेक्षित आहे. दोनशे विद्यार्थी जर गृहीत धरले, तरी ऐंशी हजार रुपयांचा खर्च अकोल्यातील विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. अकोल्यातील निष्क्रिय पुढाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हा भुर्दंड सोसावा लागतो आहे.विधी प्रवेश परीक्षेचे केंद्र अकोल्यात मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परीक्षेची वेळ काही दिवसांवर आलेली असतानादेखील अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. आमचा पाठपुरावा सुरू आहे.-अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, ज्येष्ठ विधिज्ञ अकोला.