ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:16 AM2020-12-04T11:16:17+5:302020-12-04T11:18:13+5:30

Accident News दीपकच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

The driver died when the tractor overturned | ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला.चालक दीपक विनायक इंगळे(२०) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

व्याळा: शेतात सोयाबीन काढण्यासाठी थ्रेसरसह ट्रॅक्टरने जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबून व्याळा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

व्याळा ते निमकर्दा रोडवरील एका शेतात सोयाबीन काढण्यासाठी थ्रेसरसह ट्रॅक्टरने जात असताना, नालीवरून अचानक ट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात चालक दीपक विनायक इंगळे(२०) हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दीपकच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: The driver died when the tractor overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.