शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालय ‘हाऊसफुल’

By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST

क्षमता ३00 रुग्णांची; रुग्ण ४५६

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी महिलांची मंगळवारी प्रचंड गर्दी झाली होती. ३00 रुग्णांची क्षमता असलेल्या स्त्री रुग्णालयात तब्बल ४५६ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यामुळे काही गर्भवती महिलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी पाठविले; मात्र वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या या महिलांना आल्या पावलीच परत पाठविण्यात आले. याचा त्रास गर्भवती महिलांना सहन करावा लागला. क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयामध्ये दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक झाली, तर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या जिवाशी खेळ केल्याचे दिसून आले.जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अद्ययावत वॉर्ड तयार करण्यात आले असून, नवजात बालक आणि गर्भवती महिलांसाठी हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्हय़ासोबतच वाशिम जिल्हय़ातील बहुतांश ठिकाणावरील गर्भवती महिला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रसूतीसाठी दाखल होत असल्याने डॉक्टरांवरील ताण वाढला असून, याचा प्रत्यय मंगळवारी आला. क्षमतेपेक्षा १५६ जास्त महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाची भांबेरी उडाली. स्त्री रुग्णालय प्रशासनाने काही महिलांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी पाठविले; मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या गर्भवती महिलांना दाखल न करताच परत पाठविले. त्यामुळे या गर्भवती महिलांची दिवसभर पायपीट सुरू होती. अखेर स्त्री रुग्णालय प्रशासनाने यावर तोडगा काढीत या महिलांना आवारात तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार केले. यामुळे मंगळवारी स्त्री रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप आले होते.