शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा अनुदानासाठी जिल्हा परिषद अपात्र!

By admin | Updated: February 21, 2017 01:50 IST

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसुली अत्यल्प

संतोष येलकरअकोला, दि. २0- जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने, पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी ४ कोटी ९७ लाख ९0 रुपये अनुदान मागणीचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव शासनाकडून १0 फेब्रुवारी रोजी अपात्र ठरविण्यात आला.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्हय़ात ६0 खेडी खांबोरा, ४ खेडी खांबोरा, लोहारा, वझेगाव, कारंजा-रमजानपूर व ८४ खेडी इत्यादी सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. जिल्हय़ातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सन २0१५-१६ या वर्षात ४ कोटी ९७ लाख ९0 हजार रुपये खर्च करण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला होता; परंतु प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी अनुदान उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची किमान ५१ टक्के पाणीपट्टी वसुली असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत गत मार्च २0१६ पर्यंत जिल्हय़ातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण केवळ ३.२0 टक्के असल्याने, जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४ कोटी ९७ लाख ९0 हजार रुपये अनुदान मागणीचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गत १0 फेब्रुवारी रोजी अपात्र ठरविण्यात आला.देखभाल-दुरुस्तीच्या अनुदानाची अशी आहे मागणी!सन २0१५-१६ या वर्षात जिल्हय़ातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४ कोटी ९७ लाख ९0 हजार रुपये खर्च करण्यात आला. त्यामध्ये ८४ खेडी प्रादेशिक पाणीरपुरवठा योजना -१ कोटी ५७ लाख १४ हजार रुपये, ६0 खेडी प्रादेशिक २ कोटी ४३ लाख ९0 हजार रुपये, खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना-२९ लाख १३ हजार रुपये, कारंजा-रमजानपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना-४४ लाख १७ हजार रुपये, लोहारा प्रादेशिक प्रादेशिक पाणीपुरवठा-११ लाख ८१ हजार रुपये आणि वझेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना-११ लाख ७५ हजार रुपये खर्चाचा समावेश आहे. या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चापोटी ४ कोटी ९७ लाख ९0 हजार रुपये अनुदानाची मागणी आहे.'सीईओं'नी बोलावली बैठक!जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमधील पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण विधळे यांनी २७ फेब्रुवारी रोजी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.

पाणीपट्टी वसुलीशिवाय पर्याय नाही!जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव शासनामार्फत अपात्र ठरविण्यात आल्याने, जिल्हय़ातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला पाणीपट्टी वसुलीशिवाय पर्याय नाही.