शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:05 IST

२६ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.

अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका २६ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. यासोबतच २२ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.अकोट फैलमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना विकास महादेव गायकवाड रा. अकोला हा आरोपी तिच्या घरात घुसला. त्यानंतर मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ केली. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, ५०४ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास अकोट फैल पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने याप्रकरणी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने आरोपीस कलम ४५२ अन्वये दोषी ठरवित पाच वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा, कलम ५०४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना आणखी शिक्षा तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये पाच वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या तीनही शिक्षा आरोपीला सोबत भोगायच्या आहेत. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेश अकोटकर यांनी कामकाज पाहिले. या एकाच महिन्यात अकोटकर यांनी बाजू मांडलेल्या तीन प्रकरणांत आरोपींना शिक्षा झालेली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयMolestationविनयभंग