शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वादळाची विनाशलीला

By admin | Updated: June 3, 2014 20:52 IST

अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि मान्सूनपूूर्व पावसाने थैमान घातल्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले.

अकोला : जिल्ह्यात सोमवार, २ जून रोजी ठिकठिकाणी वादळी वारा आणि मान्सूनपूूर्व पावसाने थैमान घातल्यामुळे शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरसह परिसरात रोजी सायंकाळी वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पाऊस पडला. वादळी वार्‍यामुळे लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला.
अकोला जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विविध ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. त्यात सोमवार, २ जून रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर, निंबी बु., निंबी खु., वडगाव, खेर्डा (भागाई) आदी भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. यामध्ये निंबी खुर्द येथील शेतकर्‍याच्या शेतामधील लिंबूची ६०० झाडे उन्मळून पडल्याने शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. निंबी बु. येथील विनोद दुर्योधन हेंडस्कार, देवीदास राघोजी मोतीनागरे, तर खेर्डा भागाई येथील नीळकंठ मधुकर महल्ले या लिंबू उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतामधील लिंबूची झाडे उन्मळून पडली. पिंजर, वडगाव, खेर्डा (भागाई), पार्डी, मोझरी या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वार्‍यामुळे अनेक घरांवरील टीन उडून गेले. तसेच घरांचेही नुकसान झाले. रस्त्यांवरील झाडे पडली आणि विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. निंबी खु. येथील देवचंद आत्माराम क्षीरसागर, प्रकाश निरंजन पांडे, गुलाब दामोदर, साहेबराव पांडे, साहेबराव दामोदर, सरस्वतीबाई चक्रे यांच्या घरावरील टीन उडून गेले. दरम्यान, दोनद बु. आणि तामशी येथेही सोमवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने थैमान घातले. अनेकांच्या घरावरील टीन उडून गेले. तामशी येथील जि.प. शाळेच्या छताची पूर्ण टीन उडून गेले. अनेक जनावरेही जखमी झाली. जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी क रून तत्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.