शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांना आता ‘टोल फ्री’ क्रमांकाची कवाडेही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:22 IST

अकोला :  वीज देयक न भरणार्‍या वीज ग्राहकांना महावितरणने आणखी एक ‘शॉक’ देण्याचा निर्णय घेतला असून, थकबाकीदार ग्राहकांना आता महावितरणच्या २४ तास सुरू असणार्‍या टोल फ्री क्रमांकावरूनही प्रतिसाद मिळणार नाही. या ऑनलाइन सेवेची कवाडे थकबाकीदारांसाठी बंद होणार असून, या क्रमांकावर त्यांना कोणतीही तक्रार नोंदविता येणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, थकबाकीदारांना आता या सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देनोंदविता येणार नाही तक्रार 

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  वीज देयक न भरणार्‍या वीज ग्राहकांना महावितरणने आणखी एक ‘शॉक’ देण्याचा निर्णय घेतला असून, थकबाकीदार ग्राहकांना आता महावितरणच्या २४ तास सुरू असणार्‍या टोल फ्री क्रमांकावरूनही प्रतिसाद मिळणार नाही. या ऑनलाइन सेवेची कवाडे थकबाकीदारांसाठी बंद होणार असून, या क्रमांकावर त्यांना कोणतीही तक्रार नोंदविता येणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, थकबाकीदारांना आता या सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे.राज्यभरात महावितरणचे लाखो ग्राहक असून, या ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी महावितरण नेहमीच प्रयत्नशील असते. वीज ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक तत्काळ व्हावी, या उद्देशाने महावितरणने केंद्रीय तक्रार निवारण कक्ष निर्माण केले असून, यासाठी टोल फ्री क्रमांक आहेत. मुंबई व पुणे येथे असलेल्या या केंद्रीय कक्षांमध्ये १९१२, १८00२00३४३५ किंवा १८00२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवरून संपर्क साधता येतो. या ठिकाणी असलेले प्रतिनिधी वीज ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेतात व ग्राहक ज्या जिल्हय़ातील असेल, तेथील महावितरणच्या संबंधित विभागाला त्याच्या तक्रारीची माहिती देतात. या ठिकाणी दूरध्वनीवरून संपर्क साधणार्‍या ग्राहकाला त्याचा ग्राहक क्रमांक सांगावा लागतो. महावितरणकडे वीज ग्राहकाचा मोबाइल क्रमांक आधीच नोंदणी झालेला असेल, तर त्याला ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नसते. या कक्षांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी दूरध्वनी करणार्‍या ग्राहकाचा ‘स्टेट्स’ समोर येतो. जर संबंधित ग्राहकाकडे वीज बिलाची रक्कम थकीत असेल, तर त्याची तक्रार यापुढे नोंदवून घेतली जाणार नाही. थकबाकीदार ग्राहकांना वठणीवर आणण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीदार ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदविता येणार नसल्यामुळे त्यांची आता गोची होणार आहे.

वीज बिलाबाबत तक्रार असलेल्यांना मुभाएखाद्या वीज ग्राहकाची वीज बिलाबाबत तक्रार असेल व त्यामुळे त्याच्याकडे रक्कम थकीत असेल, तर अशा ग्राहकांना यामधून वगळण्यात आले आहे. तक्रार असलेल्या वीज ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळेल. तथापि, अशा ग्राहकांच्या तक्रारीची नोंद महावितरणकडे असणे आवश्यक आहे.