शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
4
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
7
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
10
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
11
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
12
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
13
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
14
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
15
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
16
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
17
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
18
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
19
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
20
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड मतदारसंघात खाली पंजा आणि वर...!

By admin | Updated: May 16, 2014 21:57 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात येणार्‍या आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात येणार्‍या आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली. या मतदारसंघात लोकसभेत भाजपला आघाडी मिळाली तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. यावरून प्रचारादरम्यान खाली पंजा आणि वर भाजपचे संजय धोत्रे यांना पाठिंबा मिळत असल्याची चर्चा तंतोतंत खरी ठरली आहे. माजीमंत्री सुभाष झनक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात लोकसभेसोबतच पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीचा निकालही शुक्रवारी जाहीर झाला. सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक यांनी ७३३९१ मतांसह भाजपचे विजय जाधव यांच्यावर विजय मिळविला. जाधव यांना ६१२८५ मतं मिळाली. पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्याबरोबरीनेच लोकसभेत भाजपचे संजय धोत्रे यांना या विधानसभा मतदारसंघातून मतं मिळाली आहेत. त्यांनी या मतदारसंघात ७९२२४ मतं मिळवून प्रतिस्पर्धींवर आघाडी मिळविली. भाजपच्या उमेदवाराला विधानसभेत ६१२८५ मतं मिळाली. लोकसभा आणि विधानसभेतील भाजपच्या उमेदवारांमध्ये मतांची तफावत मोठी आहे. याउलट काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभेत मिळालेल्या मतांमध्ये फारशी तफावत नाही. या मतदारासंघात माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा होती. अमित झनक हे युवक काँग्रेसचे राजकारणात अनंतराव देशमुख यांचे पुत्र अमित यांचा प्रतिस्पर्धी मानला जातो. त्यामुळे या विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकालानंतरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर विधानसभेत काँग्रेस आणि लोकसभेत भाजपला मिळालेल्या मतांमध्ये बरेच साम्य आहे. याचाच अर्थ खाली काँग्रेस आणि वर भाजप चालविला जात असल्याची प्रचारादरम्यानची चर्चा तंतोतंत खरी ठरली आहे. या विधानसभा मतदारसंघात भारिपचे अरुण क्षीरसागर यांना २९५0९ मतं मिळाली असून, त्यांनी ही मतं लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही वळती केल्याचे स्पष्ट होते. या विधानसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना ३0४७६ मतं मिळाली.