शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार हेक्टरवरील कपाशीची वाढ खुंटली

By admin | Updated: October 27, 2014 23:30 IST

पश्‍चिम व-हाडात कापसाच्या पहिल्या वेचणीतच ३0 टक्के घट.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा) पावसाने दडी मारल्यामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिक धोक्यात आले आहे. पांढरं सोनं समजल्या जाणार्‍या या पिकाची विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटली आहे. कापसाच्या पहिल्याच वेचणीत कपाशीच्या उत्पादनात ३0 टक्के घट झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षी मान्सूनचे आगमन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्याने इतर पिकांच्या लागवडीचा काळ निघून गेला. कापूस लागवडीची मुदत तेवढी शिल्लक होती. त्यामुळे २0१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत २0१४-१५ च्या हंगामात १0 टक्क्यांनी का पसाची लागवड वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली. त्यापैकी पश्‍चिम वर्‍हाडात सुमारे २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात् ७ हजार ८५0 हेक्टर, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर, आणि वाशिम जिल्ह्यात् ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आलेली आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तिन्ही जिलत पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध रोगांचे आक्रमण झाल्यामुळे पिक धोक्यात आले आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला असून, पश्‍चिम वर्‍हाडातील कापूस उत्पादनात ३0 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहायाने पिकाला पाणी पुरविण्यासाठी धड पड करीत आहे. अशातच कापसाचे भाव उतरल्याने शेतकर्‍यांसमोर संकट निर्माण झाले आहे.* कोरडवाहूवरील कपाशीने माना टाकल्यापावसाअभावी कोरडवाहू शेतीवरील कपाशी पिक धोक्यात आले आहे. सध्या कोरडवाहू शेतीवरील कपाशीने माना टाकल्या असून, त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. कापसाची पहिली वेचणी सर्वत्र सुरू झाली असून, कोरडवाहूवरील कपाशी मात्र सुकण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.