तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: May 7, 2014 04:11 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T04:11:37+5:30

चान्नी: पातूर तालुक्यातील चान्नी येथील १८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मृतक तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मंगळवार ६ मे रोजी चान्नी येथीलच एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. मंगेश मोहन बरडे असे या तरुणाचे नाव आहे.

Crime against the girl's suicide | तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

चान्नी: पातूर तालुक्यातील चान्नी येथील १८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मृतक तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मंगळवार ६ मे रोजी चान्नी येथीलच एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. मंगेश मोहन बरडे असे या तरुणाचे नाव आहे.
चान्नी येथील स्वाती सीताराम पवार या १८ वर्षीय तरुणीने सोमवार, ५ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी चान्नीचे पोलिस पाटील दिनकर नितनवरे यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता; परंतु स्वातीची आई मीरा सीताराम पवार यांनी मंगळवार ६ मे रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले, की त्यांची मुलगी स्वाती आणि मंगेश मोहन बरडे यांचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून स्वातीचा लैंगिक छळ केला. आता मात्र त्याने लग्नास नकार दिल्यामुळे स्वातीने आत्महत्या केली. त्यांच्या तक्र ारीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी मंगेश बरडेविरुद्ध भादंविच्या ३७६, ३०६आणि ७६/१४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणी चान्नी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime against the girl's suicide