शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:13 PM

सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली.

अकोला: विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे. बाजारपेठेतील सर्वच प्रकारच्या वस्तू आॅनलाइन मिळत असताना, देवही कसा मागे राहील...आता देव, त्यांची पूजासुद्धा आॅनलाइन होऊ लागली आहे. मूळचे अहमदनगर येथील आणि सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली. या आॅनलाइन पूजेची सर्वत्र चर्चा होत आहे. आधुनिकतेच्या जगात, देव, धर्मालाही तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.लंडन शहरात राहणारे आयटी कन्सलटंट जयेश मंजुरे, प्राजक्ता मंजुरे, मुलगा रिवान यांची रेणुका देवीवर श्रद्धा असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात पूजा करण्याचे होते. दरम्यान, रेणुका माता मंदिराच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून अकोल्यातील जुने शहरातील रेणुका देवी मंदिराचे पुजारी अनंत शुक्ल गुरुजी यांच्यासोबत ओळख झाली. मंजुरे यांनी देवीची पूजा मांडण्याचा त्यांचा संकल्प व्यक्त केला. आम्ही तर लंडनमध्ये; परंतु पूजा करायची कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. शुक्ल गुरुजी यांनी त्यांना आॅनलाइन पूजा करण्याचा सल्ला दिला. जयेश मंजुरे यांनी लगेच तो मान्य केला आणि बुधवारी दुपारी मोबाइलद्वारे आॅनलाइन पूजा मांडण्यात आली. लंडनमधील घरात बसून मंजुरे दाम्पत्याने अकोल्यातील रेणुका देवीची मनोभावे पूजा मांडली. या पूजेमध्ये अनंत शुक्ल यांच्यासह आशुतोष शुक्ल, लौकिक चिटणवीस, अमित कुळकर्णी व विद्यासागर जवादे यांनीही सहभाग घेऊन वेद मंत्रोपचारात ही पूजा पार पडली. मोबाइलवर आॅनलाइन झालेली देवाची पूजा ही पहिलीच पूजा असल्याचा दावा अनंत शुक्ल यांनी केला आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाLondonलंडनReligious programmeधार्मिक कार्यक्रमonlineऑनलाइन