Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:36 PM2020-06-04T13:36:18+5:302020-06-04T14:28:59+5:30

Coronavirus in Akola: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला.

Coronavirus: Patient doubling rate in akola worriying | Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे

Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे

Next

अकोला : अकोल्यात कोरोनाबधितांची संख्या दुप्पट होण्याचा वेग हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा चिंताजनक असल्याचे सांगत, या मध्ये सुधारना करने ही महापलिकेची जबाबदारी असुन, 'अर्ली डिटेक्शन' करन्यासंदर्भात महापालिकेला निर्देश दिले आहेत. या साठी ३४ प्रतिबंधित क्षेत्रावर करडी नजर ठेवन्याचे निर्देशही महापालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाला दिल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यानी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. टोपे यांनी गुरुवारी अकोल्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बतमीदारांशी संवाद साधला.

 या पत्रपरिषदेत पुढी मुद्दे त्यांनी मांडले...

जनजागृतीची जबाबदारी महापालिकेची

फिवर क्लीनिकची संख्या वाढवा

एक खासगी रुग्णालय अधिग्रहित

दोन दिवसात रिक्तपदे भरणार

जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच जीएमसी मधील परिचारिकांसह वर्ग 4 चे रिक्त पद भरण्याचे निर्देश उपसंचालकांना दिले आहेत. त्यामुळे मनुष्यबलाचि समस्या राहणार नाही.

जिल्ह्यात समूह संक्रमण नाही

आतापर्यत समोर आलेले कोरोना बाधित रुग्ण हे सर्वे मधून निदर्शनास आले आहेत. त्या मुळे याला समूह संक्रमण म्हणता येणार नाही. हे सर्व रुग्ण मुम्बई, दिल्ली येथून आले असुन काही रुग्ण व्यापारी आणि दोक्टरांच्या संपर्कातील असल्याचेही त्यांनी सांगितले. 17 हजार रिक्त पदे भरणार राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा अनुशेष आहे. ही रिक्त पदे भरन्याची प्रक्रिया सुरु ज़ाली आहे. यामध्ये वैद्यकीय आधिकारयांसह इतर कर्मचारयांचिही भर्ती केली जाईल.

Web Title: Coronavirus: Patient doubling rate in akola worriying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.