शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

CoronaVirus in Akola : जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:32 PM

वाशिम जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात पातुर तालुक्यातील १५ व्यक्ती आल्याने एकच खबळब उडाली आहे.

अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून, एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. परंतु, वाशिम जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात पातुर तालुक्यातील १५ व्यक्ती आल्याने एकच खबळब उडाली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका असल्याची चर्चा वैद्यकीय वतुर्ळात सुरू असून नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बुलडाणा, वाशिमनंतर आता अमरावतीमध्येही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला आहे. या रुग्णांच्या संपर्कात काही लोक आल्याने, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणखी इतरांच्याही संपर्कात आले असून, ही एक मोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण नसलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.स्वयंशिस्त पाळण्याची गरजकोरोनाचा धोका वाढत असला, तरी शहरात अनेक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे वास्तव आहे. बँकाबाहेर केलेली गर्दी, असो वा सकाळी भाजी बाजारात केलेली गर्दी असो, सर्वच ठिकाणी नागरिक शिस्त भंग करताना दिसून येतात. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरणसर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत डॉक्टर व परिचारीकांचा संपर्क येतो. मात्र, यातील कोणता व्यक्ती कोरोणा बाधित आहे, याचा अंदाजा लावणे कठीनच आहे. अशातच येथील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा संसाधने मिळाली नसल्याने डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.हे करा बाहेर निघणे टाळामास्कचा वापर करावारंवार हात धुवानाका, तोंडाला हात लावणे टाळागर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाक - जीवनसत्व असलेने अन्न सेवन करा

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या