शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात १४ रुग्ण वाढले; १७ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:14 IST

कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७२६ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसात महिला व सात पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. सायंकाळी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही.सद्यस्थितीत १८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून, शुक्रवारी ५ जून रोजी आणखी १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७२६ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २०४ वर पोहोचला होता. मात्र, सायंकाळी १७ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८७ वर आली.कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा हा फैलाव झपाट्याने वाढत आहे. परिणामी अकोला विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, सद्यस्थितीत विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यात आणखी १४ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ७२६ वर पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी २८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व सात पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन जण गुलजारपुरा, दोन सिंधी कॅम्प,दोन हैदरपुरा तर उर्वरित गोरक्षण, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहतामिल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. मात्र, १७ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये सात जणांना घरी सोडण्यात आले, तर १० जणांना संस्थागत अलगीकरणात वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२६ झाली आहे. सद्यस्थितीत १८७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.आतापर्यंत ५०५ जणांना डिस्चार्जगत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासह अकोलेकरांचीही चिंता वाढली आहे. मात्र, दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही त्याच वेगाने वाढत असल्याने अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ५०५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या