शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात १५ टक्के रुग्ण डबल म्युटंट स्ट्रेनचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 10:40 IST

Double mutant strain : जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या जवळपास १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असण्याची शक्यता आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढला असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वैद्यकीय सूत्रांच्या मते कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असून जवळपास १५ टक्के रुग्ण या नव्या प्रकारातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध आजार असणाऱ्या व्यक्तींसह वयोवृद्धांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.

गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलल्या जात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असून, संसर्गाचा वेगही जास्त असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांच्या मते हा कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असून पूर्वीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरणारा आहे. अकोल्यासह हा प्रकार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही आढळून आल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या जवळपास १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असण्याची शक्यता आहे. लक्षणे जुनीच असली, तरी कमी वेळात रुग्ण गंभीर होत असल्याने नागरिकांनी विशेषत: विविध आजार असणाऱ्या व्यक्तींसह वयोवृद्धांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

‘एनआयव्ही’कडे पाठविले होते नमुने

जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ आणि गंभीर रुग्णांचे वाढलेले प्रमाण पाहता अकोल्यातील रुग्णांचे काही नमुने ‘एनआयव्ही’ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. लॅबला पाठविण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी साधारणत: १५ टक्के नमुने कोरोनाच्या डबल म्युटंट स्ट्रेनच्या संसर्गाचे असल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली. ‘एनआयव्ही’पुणे मार्फत हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

अल्पवधीतच रुग्ण गंभीर अवस्थेत

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अल्पावधीतच रुग्णाची प्रकृती गंभीर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी गंभीर लक्षणे दिसून येत होती, मात्र नव्या स्ट्रेनमुळे दोन ते तीन दिवसांतच रुग्णाला गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या