शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
7
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
8
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
9
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
10
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
11
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
12
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
13
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
14
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
15
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
16
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
17
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
18
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
19
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
20
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaViru in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, ११ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 18:27 IST

मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९७  वर गेली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९७  वर गेली आहे. आज दिवसभरात ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात ३७० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर उर्वरित ३५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्य १३ महिला व पाच पुरुष आहेत. सकाळच्या अहवालात तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव मंजू व पारस येथील प्रत्येकी दोन जण, तर बाळापूर, अकोला शहरातील सातव चौक व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये दोन जण महान येथील, दोन जण अकोट येथील तर उर्वरित धोत्रा ता.मुर्तिजापूर व आदर्श कॉलनी, अकोला येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.

६० वर्षीय महिला दगावली
अकोला शहरातील वाशिम बायपास भागातील एका ६० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ९१ वर गेला आहे. 

११ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात तर कोविड केअर सेंटर मधून चार अशा ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये दोघे बाळापूर, दोघे अकोट, दोघे दगडी पूल येथील तर उर्वरीत अकोट फैल, आगरवेस, जेल क्वार्टर, सोनटक्के प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

३६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १७९७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३४४ आहे. तर सद्यस्थितीत ३६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस