Corona cases in Akola : मंगळवारी एकाचा मृत्यू, पाच कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 10:40 IST2021-07-28T10:40:09+5:302021-07-28T10:40:19+5:30

Corona cases in Akola: आदर्श कॉलनी येथील ८९ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला.

Corona cases in Akola: One died on Tuesday, five corona positive | Corona cases in Akola : मंगळवारी एकाचा मृत्यू, पाच कोरोना पॉझिटिव्ह

Corona cases in Akola : मंगळवारी एकाचा मृत्यू, पाच कोरोना पॉझिटिव्ह

अकोला : जिल्ह्यात मंगळवार, २७ जुलै रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये चार व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५३९ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोला शहरातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, तर उर्वरित ५३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी करण्यात आलेल्या रॅपिड चाचण्यांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. आदर्श कॉलनी येथील ८९ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना २४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा ११३४ झाला आहे.

नऊ जणांची कोरोनावर मात

उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील एक व होम आयसोलेशन येथील आठ अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५६ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Corona cases in Akola: One died on Tuesday, five corona positive