शहराच्या विकासात व्यापारी पतसंस्थेचे योगदान- मेतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:22+5:302021-02-05T06:14:22+5:30
माहेश्वरी भवन तेल्हारा येथे पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भरत दोषी हे होते. उपाध्यक्ष डॉ. श्रीराम टोहरे, सचिव ...

शहराच्या विकासात व्यापारी पतसंस्थेचे योगदान- मेतकर
माहेश्वरी भवन तेल्हारा येथे पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भरत दोषी हे होते. उपाध्यक्ष डॉ. श्रीराम टोहरे, सचिव उद्धवराव विखे, संचालक नरेशआप्पा गंभीरे, प्रकाश पवार, संदीप अवताडे, लक्ष्मीबाई इंगळे, प्रभाकर धारपावर, सुनील पवार, सरला मारोडे, व्यवस्थापक प्रशांत विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संचालक मंडळ शहरातील असून त्यांनी एकत्र येऊन संस्था उभारली. आज या संस्थेचे भागधारक व खातेदार यांची संख्या हजाराच्या वर आहे. दिवसेंदिवस संस्थेची प्रगती होत असल्याने संस्थेशी जुळलेल्या या सर्वांच्यामुळे संस्थेच्या माध्यमातून हातभार लागत असल्याने परिणामी शहराच्या व ग्रामीण भागातील जनतेची प्रगती होत आहे. त्यामुळे या संस्थेचे एकप्रकारे विकासात्मक योगदान असल्याचे मत केशवराव मेतकर यांनी व्यक्त केले. व्यवस्थापक प्रशांत विखे यांनी अहवालवाचन केले तर संस्थेच्या प्रगतीपथात भागधारक व ठेवीदार यांचा सर्वात मोठा वाटा असून त्याचीच फलश्रुती आज संस्था स्वतःच्या मालकीच्या वास्तूत करोडो रुपयांच्या ठेवी विश्वासाने सांभाळत आहे, असे मत संस्थेचे विद्यमान सचिव उद्धवराव विखे यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने सभासद ,कर्मचारी, दैनिक संग्राहक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनिल अवताडे तर संदीप अवताडे यांनी आभार मानले.
फोटो:
८ बाय १०