शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
3
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
4
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
5
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
7
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
8
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
9
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
10
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
11
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
12
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
13
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
19
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
20
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कमिटीचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

२0 जून पासून तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण

सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकेत गत अनेक वर्षापासून कार्यपद्धतीवर टिका होत असूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत. कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीत १९ जूनपर्यंत सुधारणा झाली नाही. तर २0 जून पासून तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे.

गत दोन महिन्यापासून साखरखेर्डा शाखेत गारपीटग्रस्त साखरखेर्डा, सवडद, शिंदी, राताळी, मोहाडी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, शेवगा जहॉगीर, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, राजेगाव, दरेगाव, तांदुळवाडी, लव्हाळा, मोहखेड, हिवरा गडलिंग, हनवतखेड येथील ५ हजार ६६५ खातेदारांचे ५ कोटी रुपये येऊन पडले आहेत. यातील काहींना मदत मिळाली तर काही शेतकर्‍यांचे पैसेच जमा झाले नाहीत. पेरणीचे दिवस जवळ असले असतांना शासनाची मदत नाही आणि नविन कर्जासाठी सुरुवात नाही. यासाठी शेतकर्‍यांना पीककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे, बँकेत स्वच्छता गृह, वृद्ध, महिला, विद्यार्थी यांना बँकेत स्वतंत्र काऊंटर सुरु करावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. येथील एटीएम मशिन नेहमी बंद अवस्थेतच दिसून येते. एटीएम मशिन चोवीसतास सुरु ठेवण्याची मागणीही ग्राहकांमधून होत आहे. शाखा व्यवस्थापक सुभाष लाड यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. केवायसीची पुर्तता न झाल्याने अनेक खातेदारांचे खाते गोठविण्यात आले आहेत. काही खातेदारांनी केवायसीची पुर्तता केल्यानंतरही त्यांची अडवणूक होत आहे. पैसे काढतांना नाहक त्रास ग्राहकांना मिळतो. या सर्व प्रकारणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी केली आहे.