शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक व सुलभ कर प्रणाली असावी

By admin | Updated: August 21, 2014 00:58 IST

व्यापारी, पदाधिकारी व महापालिका प्रशासनाची जकात तसेच ‘एलबीटी’विषयी रोखठोक भूमिका

अकोला : महापालिका क्षेत्रात जकात कर लावावा, की स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा विषय राज्य शासनाने त्या-त्या महापालिकेच्या निणर्यार्थ ठेवला आहे; परंतु या विषयामुळे पुन्हा एकदा जकात व एलबीटीला घेऊन गरम चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन मांडत अकोल्यातील व्यापारी, महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी सर्वसमावेशक व सुलभ कर प्रणाली असावी, असे मत 'लोकमत'च्यावतीने आयोजित परिचर्चेत बुधवारी मांडले.

व्यापार्‍यांच्या प्रतिनिधींनी जकात किंवा एलबीटी दोन्ही कर व्यापार्‍यांसाठी घातक असल्याचे सांगितले. देशातील २८ राज्यांमध्ये हे दोन्ही कर नाहीत; तरीदेखील तेथील शासनाला आर्थिक फायदा होतो, मग महाराष्ट्रातच हट्ट का? या दोन्ही करांच्या बदल्यात आम्ही राज्य शासनाला अनेक पर्याय सुचविले; परंतु त्यावर कुठलीही भूमिका शासनाने घेतली नाही. शासन पर्याय मान्य करते; परंतु अंमलबजावणी करीत नाही. शासनाला जे जबरदस्तीने लावायचे असेल ते लावावे, आमचा विरोध सुरूच राहील. व्हॅटसारखा कर घेताना खरे तर दुसरा कुठला कर घेणे योग्य नाही. मुळात आमचा विरोध कराला नाही तर व्यवस्थेला आहे. व्यापार्‍यांना त्रास होणार नाही, अशी कर प्रणाली असावी, असे मत व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केले. महापालिका पदाधिकार्‍यांनी मनपाचे उत्पन्न वाढीसाठी जकात किंवा एलबीटी एक प्रमुख पर्याय आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी त्याला विरोध करू नये, असे मत मांडले. कुठला तरी एक कर लावावाच लागेल. व्यापार्‍यांशी चर्चा करूनच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आम्हाला व्यापार्‍यांचे सहकार्य अपेक्षित आहे. शासनाचेदेखील धोरण याबाबतीत स्पष्ट असणे अपेक्षित आहे, असेदेखील मत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. महापालिका प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कुठलाही कायदा हा पुरेपूर विचार करूनच तयार केला जातो, तो जर चुकीचा वाटत असेल तर न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे; परंतु कायद्याचे उल्लंघन चुकीचे आहे. व्यापार्‍यांनी कर भरलाच पाहिजे. कुठला कर लावावा, याचा सर्वस्वी अधिकार महापालिकेला आहे. आमसभेत जो निर्णय होईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल, असे मत प्रशासकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केले.