पोलीस कल्याण निधीचे ८0 लाखांचे लक्ष्य पूर्ण

By Admin | Updated: February 18, 2015 02:04 IST2015-02-18T02:04:15+5:302015-02-18T02:04:15+5:30

प्राप्त निधीतून विदर्भातील पहिले पोलीस लॉन उभारणार.

Complete the target of 80 lakhs of Police Welfare Fund | पोलीस कल्याण निधीचे ८0 लाखांचे लक्ष्य पूर्ण

पोलीस कल्याण निधीचे ८0 लाखांचे लक्ष्य पूर्ण

अकोला : शहरातील सातही पोलीस ठाण्यांना दिलेले पोलीस कल्याण निधीचे ८0 लाख रुपयांचे लक्ष्य पूर्ण झाले. प्राप्त निधीमधून विदर्भातील पहिले पोलीस लॉन उभारले जाणार आहे. पोलीस लॉन उभारण्याचे काम जिल्हा परिषद मार्गावरील राणी सतिधाम मंदिरासमोरील भव्य जागेमध्ये सुरू आहे. पोलीस कल्याण निधीसाठी रविवारी मुंबईच्या अश्रफ खान आणि दीपाली सय्यद यांच्या आर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला. या आर्केस्ट्राच्या माध्यमातून पोलीस कल्याण निधी गोळा करण्याचे शहरातील पोलीस ठाण्यांना ८0 लाख रुपयांचे लक्ष्य दिले होते. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी २0 दिवसांमध्ये लक्ष्यांक गाठले. या निधीचा शहरातील सुसज्ज पोलीस लॉन उभारण्यासाठी वापर होणार आहे. पोलीस दलासाठी स्वत:चे स्वतंत्र असे सभागृह किंवा ठिकाण असावे, या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद रोडवरील राणी सतिधाम मंदिरासमोर काटेरी झाडाझुडपांनी आणि नाल्यांनी वेढलेला भूखंडाची पाहणी केली आणि त्याची पोलीस लॉनसाठी निवड यापूर्वीच केली होती. हा भूखंड समतल करण्यात आला असून, त्यावर लवकरच एका नर्सरीमार्फत हिरवागार गालीचा तसेच विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे लावण्यात येणार आहेत. लॉनचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर चारही बाजूंनी संरक्षण कुंपण किंवा आवारभिंत उभारण्याची योजना आहे.

Web Title: Complete the target of 80 lakhs of Police Welfare Fund