शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

By admin | Updated: January 1, 2015 00:30 IST

हलका पाऊस, किमान तापमानात वाढ, तूर, हरभरा, फळ पिकांना धोका.

अकोला : विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी हलक्या स्वरू पाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या वातावरणाचा फटका मात्र तूर, हरभरा या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान, या वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. २0१४ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने खरीप पिके हातची गेली आणि रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. अकोला जिल्हय़ात तर ३0 ते ४0 टक्के शेतकर्‍यांनीच रब्बी पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये हरभरा पीक सर्वाधिक आहे. तथापि जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी हे पीक उलटले आहे. जेथे हरभरा आला त्याची वाढ खुंटली आहे.अशावेळी अवकाळी पावसाचे ढग तयार झाल्याने, या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, थंडी वाढल्यास त्याचा फटका या पिकांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्यात गहू पेरणी केली आहे. हे गव्हाचे पीक परिपक्वता म्हणजेच ओंबीवर आले आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा फटाक बसण्याची शक्यता आहे. करडई तेलबिया पिकाची काही ठिकाणी पेरणी केली आहे. या पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, भाजीपाला, फळ पिके,आंब्याचा मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीक शेतात आहे. या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कापूस शेतात असेल तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी जेथे कापूस काढून झाला तेथील कापसाला या पावसामुळे नवी फरदड येईल. अवकाळी पाऊस दोन-चार दिवस सुरू राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाल यांनी वर्तवली.