शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात गावगुंडांचा धुडगूस

By admin | Updated: August 1, 2014 02:23 IST

तीन बस गाड्यांसह वाहनांची तोडफोड

अकोला- मध्यवर्ती बसस्थानक चौकात गुंडप्रवृत्तीच्या एका सशस्त्र टोळीने गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास धिंगाणा घातला. तोंडावर कापड बांधून आलेल्या या टोळक्याने तीन बसेससह शहर वाहतूक सेवेची एक बस, एक ट्रक व एका जी पवर दगडफेक करीत लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली. १0 ते १५ मिनिट घातलेल्या या हैदोसामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुधवारी मध्यरात्रीपासून हा हैदोस सुरू असून दोन ज्वेलर्स व महापालिकेच्या इमारतीवरदेखील अशाच प्रकारची दगडफेक बुधवारी रात्री करण्यात आली.शहरात गुंडप्रवृत्तीच्या १0 ते १५ जणांचा समावेश असलेल्या एका टोळक्याने बुधवारी रात्रीपासून धिंगाणा सुरू केला असून, त्यांनी विश्‍वकर्मा ज्वेलर्स, वैंश पायन ज्वेलर्सच्या काचा फोडल्या. गांधी रोडवर अश्लील शिवीगाळ करीत महा पालिकेच्या इमारतीवर दगडफेक केली. या घटनेला १२ तासांचा कालावधी होत नाही, तोच या टोळक्याने गुरुवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक चौकात धुडगूस घा तला. यामध्ये टोळक्याने एमएच ४0 वाय ५११३ क्रमांकाच्या बुलडाणा-मंगरुळपीर एसटी बस, एमएच ४0 वाय ५६८४ क्रमांकाची यवतमाळ-धुळे, जुने बसस् थानकावरील एमएच २0 डी ९0८0 क्रमांकाच्या बसची तोडफोड केली. या तीनही बसवर दगडफेक केल्यानंतर लोखंडी शस्त्राने हल्ला चढविला. यावेळी बसस् थानकासमोरून गॅस सिलिंडर भरून जात असलेल्या एमएच २८ बी ७७३३ क्रमांकाच्या ट्रकवरही दगडफेक करून काचांची तोडफोड केली. अशोकनगरवरून खडकीकडे जाणार्‍या शहर वाहतूक शाखेच्या बसच्याही काचा फोडल्या. हा हैदोस झाल्यानंतर या टोळक्याने मध्यवर्ती बसस्थानकावरून पळ काढून दुर्गा चौकातील महावितरणची एमएच ३0 पी ९२४१ क्रमांकाच्या जीपचीही तोडफोड केली. तोंडाला कापड बांधून आलेल्या या टोळक्याने शहरात सशस्त्र हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. *गावगुंडांचे राज्यजिल्हा पोलिस प्रशासनाचे गावगुंडांसह चोरटे, दरोडेखोर व खंडणीबहाद्दरांवर कुठलेही नियंत्रण राहिले नाही. पोलिसांच्या नाकावर टिच्चून खंडणीबहाद्दरांचा हैदोस सुरू आहे. पोलिस यंत्रणा कुचकामी झाल्याने बुधवारी रात्रीपासून गुंड प्रवृत्तीच्या एका टोळक्याने सशस्त्र धिंगाणा घातला आहे. मात्र, पोलिसांना दोन दिवस उलटल्यावरदेखील यामधील एकाचाही सुगावा लागला नाही. यावरून जिल्हा पोलिस प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगल्या गेली असून, गुंडांनी त्यांना खुले आव्हानच दिल्याचे स्पष्ट होत आहे.*चार संशयित ताब्यातबुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या या हैदोस प्रकरणातील चार संशयित आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. मात्र त्यांच्यावर ११0 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. यामध्ये बाळापूर येथील रहिवासी उमान मोहम्मद अक्रम, शिवणी येथील रहिवासी शेख रहेमान शेख बिस्मिल्ला, शिराज खान महेमूद खान, मो. आरीफ मो. आतीक यांचा समावेश आहे.