मुख्य निवडणूक अधिकारी आज अकोल्यात

By Admin | Updated: May 25, 2014 00:49 IST2014-05-25T00:35:50+5:302014-05-25T00:49:28+5:30

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे रविवारपासून तीन दिवसांच्या अकोला दौर्‍यावर येत आहेत.

Chief Electoral Officer in Akolat today | मुख्य निवडणूक अधिकारी आज अकोल्यात

मुख्य निवडणूक अधिकारी आज अकोल्यात

अकोला : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे रविवारपासून तीन दिवसांच्या अकोला दौर्‍यावर येत आहेत. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या २0 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यात सध्या शिक्षक मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राज्य मुख्य निवडणूक अधिकारी गद्रे २५ ते २७ मे या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला दौर्‍यावर येत आहेत. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम राहणार असून, निवडणूक विषयक तयारीसह मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामांची जिल्हानिहाय माहिती मुख्य निवडणूक अधिकारी घेणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Chief Electoral Officer in Akolat today