शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ ‘कॅँडल मार्च’

By admin | Updated: September 6, 2014 02:18 IST

‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यातील हजारो नागरिकांनी कॅँ डल मार्च काढला.

अकोला - नागपूर येथील प्रसिद्ध दंतचिकित्सकांचा मुलगा युग चांडक याची हत्या केल्याच्या निषेधार्थ तसेच दोषींना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी अकोल्यातील हजारो नागरिकांनी कॅँ डल मार्च काढला. या आंदोलनात शेकडो महिला, चिमुकले व हजारो नागरिक सहभागी झाले होते. नागपूर येथील दंत चिकित्सक डॉ. चांडक यांचा मुलगा युग याचे त्यांच्याच हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी अपहरण करून हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण विदर्भ हादरला असून, घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. याच घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या नागरिकांनी शिक्षक दिनी कॅँ डल मार्च काढून निषेध केला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ३0 मिनिटांनी गांधी चौक येथून हा कॅँ डल मार्च काढण्यात आला. गांधी मार्गावरून खुले नाट्यगृह परिसर व त्यानंतर गांधी-जवाहर बागेत या कॅँ डल मार्चचा समारोप करण्यात आला. या आंदोलनाद्वारे युग चांडकची हत्या करणार्‍यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात महाराष्ट्र इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष द्वारका चांडक, राष्ट्रवादीचे ओमप्रकाश सावल, अँड. मोतीसिंह मोहता, डॉ. आर. बी. हेडा, राजेश भारती, पराग कांबळे, दर्शन खंडेलवाल, गोपाल केला, डॉ. राजेश अग्रवाल, अँड. देवेन अग्रवाल, विवेक मंत्री, निकेश गुप्ता, विनीत बियाणी, अविश अटल, अँड. धर्मेंद्र सरनाईक, विष्णू खंडेलवाल, अनिल थानवी, बबलू अग्रवाल, संतोष हेडा, सुनील इन्नानी, अमोल ककरानीया, गोविंद सोढा, निकुंज गढिया, संजय अग्रवाल, मनीष खंडेलवाल, पवन बाहेती, संतोष मनीयार, संदीप जोशी, नरेश राठी, श्याम सुनारीवाल, नीलेश मेहता, संजय खंडेलवाल, गोविंद खंडेलवाल, बसंती खंडेलवाल, सुनील खंडेलवाल, मंजू तूलशान, उषा बाहेती, शोभा जाजू, रेवती जोशी, ज्योती केडीया, मनोज जगवानी, आकाश कवडे, अंशुमन देशमुख, मो इर्शाद आदी सहभागी झाले होते.