गोपालखेड पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी

By Admin | Updated: May 29, 2014 21:03 IST2014-05-29T19:54:48+5:302014-05-29T21:03:22+5:30

गांधीग्राम : येथून जवळच असलेल्या गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Cable steal of Gopalkhed Water Supply Scheme | गोपालखेड पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी

गोपालखेड पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी

गांधीग्राम (अकोला) : गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोपालखेड येथील पाणीपुरवठा योजनेला पूर्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. नदीकाठावरील जॅक वेल पंपहाऊसपासून नदी पात्रातील मोटारपंपापर्यंत टाकण्यात आलेली तांब्याची ४० मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री चोरून नेली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाखा अभियंता आर. एम. इंगळे यांनी त्याबाबतची तक्रार चोहो˜ा बाजार पोलिस चौकीत केली. सदर केबलची अंदाजे किंमत ५००० रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. केबल चोरी गेल्यामुळे पाणी खेचणारी मोटार बंद पडली. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Cable steal of Gopalkhed Water Supply Scheme