घरफोडी इंदुरात ; सोने विकले अकोल्यात

By Admin | Updated: June 22, 2014 01:55 IST2014-06-22T01:40:15+5:302014-06-22T01:55:51+5:30

इंदूर येथे झालेल्या घरफोडीतील सोने अकोल्यात विकल्याचा प्रकार शनिवारी उजेडात आला.

Burglary Indoor; Gold sold in Akolatan | घरफोडी इंदुरात ; सोने विकले अकोल्यात

घरफोडी इंदुरात ; सोने विकले अकोल्यात

अकोला : इंदूर येथे झालेल्या घरफोडीतील सोने अकोल्यात विकल्याचा प्रकार शनिवारी उजेडात आला. आरोपीने घरफोडीतील विकलेले १५८ ग्रॅम सोने आणि ५५0 ग्रॅम चांदी इंदूर पोलिसांनी जप्त केली.
इंदूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चोरीच्या घटनेत किशोर जाधव नामक आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने बंद घरातून २५0 ग्रॅम सोने आणि ५५0 ग्रॅम चांदी लंपास केली. इंदूर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. आरोपीने सोने आणि चांदी अकोल्यातील सराफा व्यावसायिकाला विकल्याची कबुली दिली. इंदूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संजय नामक सराफा व्यावसायिकाला विकलेले सोने आणि चांदी जप्त केली. या कारवाईनंतर इंदूर पोलिस शनिवारी रवाना झाले.

Web Title: Burglary Indoor; Gold sold in Akolatan